Player Profile

श्री. प्रदीप पाटील

संस्थेचे नाव :सहकार कला क्रीडा विज्ञान केंद्र, वडाळा
कार्यकाळ :​२०१८-१९
पुरस्कार :ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार
इतर :सहकार कला क्रीडा विज्ञान केंद्र - कार्यकर्ता , ​खेळाडू

श्री. प्रदीप पाटील

​१९७३ साली खो खो खेळास सुरवात केली. वडाळ्याच्या सहकार कला क्रीडा विज्ञान मंडळाचे श्री. प्रदीप पाटील हे आघाडीचे खेळाडू होते. लहानपणापासूनच त्यांनी खो खो खेळाचे प्रशिक्षण श्री. प्रभाकर परब यांच्याकडे घेतले. जानेवारी १९७४ साली देवास (मध्य प्रदेश)​ येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्यांना सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यु हा पुरस्कार पहिल्यांदाच मुंबईच्या खेळाडूस प्राप्त झाला. 
 
त्यांनी मुंबईच्या पुरुष संघाचे कर्णधारपद भूषवितांना मुंबईच्या संघास राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवून दिला महाराष्ट्राच्या संघाचा उपकर्णधार म्हणूनही त्यांनी चमक दाखविली महाराष्ट्राच्या पुरुष संघात ६ वेळा समावेश, २०व्या राष्ट्रीय स्पर्धेत संघाचा उपकर्णधार अशी दैदिप्मान कारकीर्द केली. १९८२-८३ ते १९८५-८६ पर्यंत सातत्याने राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केली. २ वेळा फेडरेशन चषक स्पर्धेत सुद्धा महाराष्ट्राच्या संघात सहभागी. १९८२ साली दिल्ली येथे झालेल्या एशियाड स्पर्धेत महाराष्ट्राचा सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून त्यांना सन्मानित केले गेले
 
खो खो खेळाच्या जोरावर बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीस लागल्यावर त्यांचा खेळ अजूनच बहरला. त्यांना व्यवसायिक गटातील स्पर्धेत आघाडीचा खेळाडूं म्हणून पाहिलं जायचं. बँकेत पुढची पिढी खेळायला उतरल्यावर सुद्धा आपल्या संघाचा सामना बघायला ते आजही आवर्जून उपस्थित असतात.
 
१९८६ नंतर त्यांनी खो खो खेळाचा प्रचार व प्रसार करण्यास सुरवात केली. मिरज येथे झालेल्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या कुमार संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पहिले. पंजाब येथील मुंबई विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पहिले. श्री. दत्त मोरे, श्री. यशवंत नाईक यांचे मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्यकारी मंडळात त्यांनी प्रवेश केला. सन १९९२ पर्यंत संघटनेच्या प्रत्येक कार्यात ते अग्रेसर असायचे. मुंबई महापौर स्पर्धा असो, राज्य अजिंक्यपद स्पर्धा असो कि अखिल भारतीय निमंत्रित स्पर्धा असो या सर्वांच्या आयोजनात त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या हातोहात पार पाडल्या. अजूनही कार्यरत राहण्याची प्रबळ इच्छा होती पण तब्येतीच्या कारणामुळे शहर सोडून उपनगरात स्थायिक व्हावे लागले.
loading