जाहिरातदार / मुंबई खो खो संघाचे प्रायोजक

इतिहास

खो-खो ला निश्चित असा इतिहास नाही. याबाबत अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न करूनही ठोस असा पुरावा कुणालाच मांडता आला नाही. याबाबत अनेक तर्क मात्र लढवलेले गेले आहेत, त्यातील एक म्हणजे महाभारतातील बर्‍याच बाबी ह्या खेळाशी साधर्म्य दाखवतात. कर्णाचा साथीदार शल्य उत्तम अश्वचालक होता. तसेच कृष्णही उत्तम अश्वचालक होता.

​युद्धात रथांच्या सहाय्याने भेदला जाणारा रथोद नावाचा व्युह असो व तो भेदण्यासाठी चाल असो यात दोघेही आपले रथ एकेरी साखळी पद्धतीने टाकत पुढे मार्ग काढत जायचे. अभिमन्यु जेव्हा कौरवांचे चक्रव्यूह भेदत आत शिरला​​ ते तंत्र गोलातला खेळ तोडणे ह्या तंत्राशी साधर्म्य दाखवते. मात्र एवढ्याश्या उदाहरणावरून खो-खो ची उत्पत्ती महाभारत काळापासून झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आपल्या संतांच्या ओव्यांमधेही खो-खो चा उल्लेख असल्याचा दाखला अनेकजण देतात.

संपूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा…

मान्यवर पुरस्कार विजेते