श्री. प्रभाकर वाईरकर
कै. एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार (२०२०-२१)
खोखोचा आवाज लालबागच्या खटाव इमारतीच्या पटांगणात घुमला. तेथे खो खो खेळाचा श्री गणेशा गिरविला. त्यानंतर श्री. सदाशिव वाईरकरांनी परेलच्या मेरवानजी वाडीत खो खोचे मैदान तयार केले. माजी खो खो खेळाडू म्हणून अल्पकाळ कारकीर्द.
- विद्यार्थी केंद्राच्या खो खो च्या ‘ब’संघात खेळाडू म्हणून स्थान.
- त्यानंतर छबिलदास मुलांच्या शाळेतून ४ वर्षे प्रतिनिधित्व केले.
- नंतर विद्यार्थी केंद्राच्या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून काम पहिले. १९६० ते १९९२ पर्यंत कार्यरत.
- १९६४ पासून विद्यार्थी केंद्रात अनेक खो खो स्पर्धा झाल्या त्यात कार्यकर्ता म्हणून कामगिरी
- विद्यार्थी केंद्राच्या रौप्य महोत्सवी, अखिल भारतीय खो खो स्पर्धेचे आयोजन सेंट झेविअर कॉलेजच्या मैदानात झाले या स्पर्धांना आघाडीचा कार्यकर्ता म्हणून कामगिरी.
- मुंबई खो खो संघटनेत १९७६ पर्यंत विद्यार्थी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीत.
- या कालावधीत अनेक स्पर्धांना पंच प्रमुख म्हणून कामगिरी पार पाडली.
- १९९२ च्या मुंबई महापौर अखिल भारतीय खो खो स्पर्धेत कार्यकर्ता म्हणून कार्य केले.
- मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे पंच परीक्षा उत्तीर्ण (१९६४)
- महाराष्ट्र खो खो असोसिएशनची पंच परीक्षा उत्तीर्ण
- अखिल भारतीय खो खो फेडरेशनची पंच परीक्षा उत्तीर्ण (१९७६)
- मुंबईत झालेल्या अनेक स्पर्धांना पंच म्हणून नेमणूक
- मुंबई खो खो संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद व चाचणी खो खो स्पर्धा
- विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित अनेक स्पर्धा
- अमर हिंद मंडळ, विजय क्लब आयोजित अनेक स्पर्धा
- राज्यस्तरीय स्पर्धा – मुंबई धुळे, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, जळगाव, रोहा(अलिबाग), बोरगाव (सांगली) इत्यादी
- अखिल भारतीय स्पर्धा – धुळे, सोलापूर, ठाणे, पुणे, मुंबई, बडोदे
- शालेय राष्ट्रीय स्पर्धा – हैदराबाद, धुळे, श्रीनगर
इतर विशेष
मुंबई खो खो संघटनेतर्फे निवड समितीवर सभासद
महाराष्ट्र खो खो असोसिएशनतर्फे सातारा येथील पंच परीक्षेत निरीक्षक म्हणून नियुक्ती तसेच अनेक पंच शिबिरास मार्गदर्शन