मुंबई खो खो संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा माननीय अध्यक्ष ​श्री. ​शिवकुमार लाड यांच्या अध्यक्षतेखाली सक्कर भवन,​ वडाळा येथे पार पडली. या प्रसंगी अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या  हस्ते ​६ मान्यवरांना कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार​ प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह  व ५,००० धनादेश असे होते. हे पुरस्कार सर्वश्री श्री.  विश्वनाथ म्हात्रे, श्री. सतीश प्रधान, श्री. शेखर पाठारे, श्री. रमाकांत शिंदे व श्री. राजन राणे तसेच गतवर्षीचे पुरस्कारार्थी श्री सुहास देशमुख अशा सर्वांना प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी पुरस्कारार्थी बाबत ​ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ​ श्री. रमेश वरळीकर, मैदान बचाव समितीचे श्री. भास्कर सावंत, ​​प्रमुख कार्यवाह ​अॅड. अरुण देशमुख, ​कार्याध्यक्ष ​श्री. बाळ तोरसकर,​माजी राष्ट्रीय खेळाडू ​​सौ. प्रज्ञा पोंक्षे, ​खजिनदार ​श्री. पुष्पराज बागायतकर, ​उपाध्यक्ष ​श्री. अरुण देशपांडे व श्री. तुषार सुर्वे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या व योग्य वेळी सर्व पुरस्कारार्थीचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सर्व​ ​पुरस्कारार्थींनी​ आपला सन्मान केल्याबद्दल संघटनेचे आभार मानले व असाच आदर्श इतर संघटनांनी सुद्धा घ्यावा असे मत व्यक्त केले. माननीय अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांनी पुरस्कार देण्यामागची भावना समजावून सांगितली व सर्व पुरस्कारार्थीनी आपापले खो खो क्षेत्रातले कार्य चालू ठेवावे अशी विनंती केली.

या प्रसंगी माननीय अध्यक्ष​​​ श्री. शिवकुमार लाड यांनी पुरस्कृत संघटनेचे संकेतस्थळाचे अनावरण जेष्ठ क्रीडतज्ञ व मैदान बचाव समितीचे भास्कर सावंत, तसेच खो खो सांख्यिक तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. www.khokhomumbai.org ह्या संकेतस्थळावर मुंबई खो खो संघटनेची संपूर्ण माहिती, इतिहास, नियम नियमावली, परिपत्रके तसेच छायाचित्र पाहायला उपलब्ध असतील व संकेतस्थळ सर्वांनाच बघायला आवडेल अशी आशा दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केली. या प्रसंगी खो खो क्षेत्रातील अनेक मान्यवर खेळाडु, कार्यकर्ते व प्रशिक्षक आवर्जून उपस्थित होते.