​31 वी मुंबई महापौर चषक जोड जिल्हा निमंत्रित पुरुष-महिला व व्यावसायिक (पुरुष) गट जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धा दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी, २०१८ या कालावधीत कै. केशवराव दाते मैदान, आगाशे पथ, दादर (पश्चिम), मुंबई येथे संपन्न झाली.

व्यावसायिक गटामध्ये प्रथम क्रमांक – पश्चिम रेल्वे, द्वितीय क्रमांक – मध्य रेल्वे, तृतीय क्रमांक – महावितरण विद्युत कंपनी तर चतुर्थ क्रमांक – बृहन्मुंबई महानगर पालिका संघाने प्राप्त केला.

या गटातील अष्टपैलू खेळाडूचा मान मिलिंद चावरेकर (मध्य रेल्वे), सर्वोकृष्ट संरक्षक – अमित पाटील (पश्चिम रेल्वे) तर सर्वोकृष्ट आक्रमकाचा मान मजहर जमादार (पश्चिम रेल्वे) प्राप्त केला.

पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक श्री सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), द्वितीय क्रमांक – ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर (मुंबई), तृतीय क्रमांक – प्रबोधन क्रीडा भवन (मुंबई उपनगर) तर चतुर्थ क्रमांक महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी (मुंबई उपनगर) या संघाने प्राप्त केला. 

या गटातील अष्टपैलू खेळाडूचा मान दुर्वेश साळुंखे (श्री सह्याद्री संघ), सर्वोकृष्ट संरक्षक – प्रयाग कनगुटकर (ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर) तर सर्वोकृष्ट आक्रमकाचा मान संकेत सावंत (श्री सह्याद्री संघ) प्राप्त केला.

महिला गटामध्ये प्रथम क्रमांक महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी (मुंबई उपनगर), द्वितीय क्रमांक – शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई), तृतीय क्रमांक – अमर हिंद मंडळ (मुंबई) तर चतुर्थ क्रमांक श्री समर्थ व्यायाम मंदिर (मुंबई) या संघाने प्राप्त केला.

या गटातील अष्टपैलू खेळाडूचा मान मिताली बारस्कर (महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी), सर्वोकृष्ट संरक्षक – साक्षी वाफेलकर (महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी) तर सर्वोकृष्ट आक्रमकाचा मान शिवानी गुप्ता (शिवनेरी सेवा मंडळ) संघाने प्राप्त केला.

बक्षीस समारंभास विभाग प्रमुख श्री. आशिष चेंबूरकर, स्थानिक नगरसेविका सौ. प्रीती पाटणकर, मुंबई खो खो संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड व संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित, महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने, मुंबई खो खो संघटनेच्या विद्यमाने व वैभव स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने ​३१ वी मुंबई महापौर चषक खो खो स्पर्धा २०१७-१८ दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी, २०१८ या कालावधीत कै. केशवराव दाते मैदान, अगाशे पथ, दादर (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उदघाटन मुंबई शहराचे महापौर मा. श्री. प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते गुरुवारी दि. ८ फेब्रुवारी, २०१८ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेविका सौ. प्रीती पाटणकर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक श्री. कमलाकर कोळी (सहकार्यवाह – महाराष्ट्र खो खो असोसिएशन) सुद्धा उपस्थित राहणार असून सोबत संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य हेही उपस्थित राहतील.

सदर स्पर्धा हि जोड जिल्हा स्तरावरील असल्याने मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील अनेक मात्तबर असे पुरुष व महिलांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची खास बाब म्हणजे पुरुष व महिला गटाबरोबरच व्यावसायिक पुरुष संघाची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा सुद्धा या दरम्यान घेण्यात येणार असल्याने प्रेक्षकांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मात्तबर खेळाडूंचा प्रदर्शनीय खेळ या निमित्ताने पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोप समारंभ रविवार दिनांक ११ फेब्रुवारी, २०१८ रोजी रात्रौ ठीक ८:०० वाजता संपन्न होईल. हा कार्यक्रम शिवसेना नेते मा. श्री. प्रिं. मनोहर जोशी, आमदार श्री. सदा सरवणकर, उपमहापौर मा. सौ. हेमांगी वरळीकर व नगरसेविका सौ. विशाखा राऊत यांच्या उपस्थितीत होईल.