श्री. भालचंद्र चांदोरकर

चांदोरकर सर यांना लहानपणापासून खेळाची आवड. श्री समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेचे तसेच मुंबई खो-खो संघटनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले. तसेच सागर भूमी ब्राह्मण सेवा महासंघ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य म्हणून आजही कार्यरत आहेत.

ब्राह्मण सेवा मंडळातर्फे भरविण्यात आलेल्या अनेक खो खो स्पर्धांच्या आयोजनामध्ये त्यांच्या सहभाग प्रामुख्याने होता. २००३ सालच्या राज्यस्तरीय किशोर – किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत, २०१० साली पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी तसेच २०१६ साली पुरुष – महिला गट राज्यस्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. चांदोरकर सर म्हटले की कार्यकर्त्यांना मंचकावरची हक्काची जबाबदारी घेणारा व्यक्ती हो ओळख प्रामुख्याने आठवणीत राहते.