श्री. वैजनाथ श्रीधर वैद्य

दादर मधल्या एकेकाळच्या नावाजलेल्या वैभव स्पोर्टस् क्लब, दादर या संस्थेला यंदा ४५  वष॔  पूर्ण  होत आहेत. याच  संस्थेचे संस्थापक श्री. वैजनाथ श्रीधर वैद्य सर.

आजवर या संस्थेने अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विद्यापीठ तसेच शालेय स्तरावरील उत्तम  खो  खो  खेळाडू  मुंबई व महाराष्ट्राला दिले.

वैद्य सरांनी पतियाळा  NSAIDs  मध्ये खो  खो प्रशिक्षण पूर्ण  करून मुंबई  खोखो  संघटना  पंच  मंडळावर  काम केलेले आहे.

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या माध्यमातून कराड,  बारामती,  विजयवाडा,  बडोदा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पंच मंडळावर  काम केलं आहे.

राजस्थान येथे  खोखो प्रशिक्षणाचे कार्य सुद्धा सरांनी केलेले आहे

महाराष्ट्राच्या सीमेवरील तलासरी या आदिवासी बहुल भागात आदिवासी  मुलांना खो खो प्रशिक्षण दिले.

त्रिपुरा येथे  महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पदावर  नेमणूक  झालेली होती.

सरांच्या मार्गदर्शनाखाली वैभव स्पोर्टस् क्लबने महिला विभागात अनेक वेळा जिल्हा अजिंक्यपद मिळविलेले आहे.

त्यांच्याच क्लबच्या सुजाता शिकें, वंदना शेटये, प्रेमा शेटये यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा आपल्या खेळाने गाजवून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला.

भारत सरकारचा खेळातील सर्वोच्च पुरस्कार – अर्जुन पुरस्कार वैभव स्पोर्टस् क्लबच्या वीणा परब यांनी १९८३ साली मिळविला.