मुंबई खो खो संघटनेची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २७ ऑगस्ट, २०२३ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सक्कर भवन, रफी किडवाई मार्ग, वडाळा, मुंबई येथे संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या सौ. माधुरी कोळी या निरीक्षक म्हणून सभेस उपस्थित होत्या.
याप्रसंगी अमर हिंद मंडळाचे श्री. सतिश रेडिज व ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचे डॉ. दिलीप साठे यांना ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केलेल्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या कु. श्रेयस राऊळ व अमर हिंद मंडळाच्या कु. प्रसाद राडीये यांचाही सन्मान करण्यात आला.
मुंबई खो खो संघटनेची कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते, खेळाडू याप्रसंगी उपस्थित होते. श्री. बाळासाहेब तोरसकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.