श्री. पुष्पराज मोहन बागायतकर

शिक्षण : एस. एस. सी. व आय. टी. आय.
नोकरी : माझगाव डॉक लिमिटेड (निवृत्त)
संस्था : विजय क्लब / माझगाव डॉक स्पोर्टस क्लब

राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय खेळाडू, पंच व प्रशिक्षक म्हणून कारकीर्द

खेळाडू :

 • १९७२ – बारामती (महाराष्ट्र) पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
 • १९७५ – बडोदे (गुजरात) पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
 • १९८३ – संगरुर (पंजाब) पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
 1. इंदोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या टेस्ट सिरीज सामन्यात शेष भारत संघातून प्रतिनिधित्व
 2. अनेक अखिल भारतीय निमंत्रित तसेच राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभाग
 3. मुंबई जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत विजय क्लब तर्फे ११ वेळा अंतिम विजयी संघ
 4. राज्यस्तरीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत मुंबई संघातून १९७२ ते १९८१ व १९८३ (एकूण ११ वेळा) निवड
 5. १९७५ साली मुंबई संघाचा कर्णधार

मुंबई जिल्हा खो खो संघटनेच्या व्यावसायिक स्पर्धेत ४ वेळा अंतिम विजयी (माझगाव डॉक्स खो खो स्पर्धा)

बालक विहार शाळेतर्फे हिंद चषक स्पर्धेत खो खो व लंगडी स्पर्धा गाजविल्या.

प्रशिक्षक :

 • ३२ वी महिला गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा, नाशिक (महाराष्ट्र)
 • ३९ वी पुरुष गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा, धुळे (महाराष्ट्र)
 • अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठ संघाचा प्रशिक्षक

पंच :

 • अनेक वेळा राज्य व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत (नशनल गेम्स) पंच म्हणून कामगिरी
 • महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पंच मंडळाचा अध्यक्ष (माजी)
 • मुंबई खो खो संघटनेच्या पंच मंडळाचा अध्यक्ष (माजी)

मार्गदर्शन : अनेक वेळा राज्य पंच शिबीरात मार्गदर्शन

निवड समिती सदस्य :

 • मुंबई विद्यापीठ स्पर्धा
 • मुंबई जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

कार्यकर्ता :

 • मुंबई खो खो संघटनेचे कार्यकारीणी सदस्य तसेच खजिनदार पद (माजी)
 • विजय क्लब – प्रमुख कार्यवाह

सहभाग :

 • अखिल भारतीय खो खो स्पर्धा आयोजन
 • मुंबई महापौर चषक खो खो स्पर्धा आयोजन
 • सन १९६५ पासून आजतागायत खो खो खेळाशी कायम निगडीत