श्री. उदय विश्वनाथ देशपांडे

शिक्षण – बी. एस्. सी. – रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, मुंबई विद्यापीठ (१९७३).

नोकरी – कस्टम्स अँड सेन्ट्रल एक्ससाईजमधून उपआयुक्त (Deputy Commissioner) म्हणून २०१३ मध्ये निवृत्त

  • १९७६ साली एन.आय.एस. परीक्षा उत्तीर्ण
  • राज्य स्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण
  • राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण
  • १९८७ ते १९९९ पर्यंत राज्य पंच शिबिरांना उपस्थिती

प्रमुख पुरस्कार

  • १९८२ – क्रीडा गौरव पुरस्कार (९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजन समिती)
  • १९८२-८३ – शिव छत्रपती पुरस्कार क्रीडा पुरस्कार (महाराष्ट्र शासन)
  • २००१ – उदय राजाराम लाड क्रीडा गौरव पुरस्कार (यु. आर. एल. फाउंडेशन)
  • २००१ – मनोहर विचारे क्रीडा गौरव पुरस्कार (मनोहर विचारे प्रतिष्ठान)
  • २००४ – जिल्हा क्रीडा पुरस्कार (मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय)
  • २००४ – प्रो. माणिकराव गुणवत्ता पुरस्कार(श्री समर्थ व्यायाम मंदिर)
  • २००५ – दादोजी कोंडदेव पुरस्कार (महाराष्ट्र शासन)
  • २००९ – श्री सिध्दीविनायक एकलव्य पुरस्कार (सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास)
  • २०१६ – क्रीडा गौरव पुरस्कार (कस्टम्स व सेन्ट्रल एक्साईज खाते)
  • २०१८ – १९ – शिव छत्रपती पुरस्कार क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन)

तसेच देशभरातील अनेक क्रीडा संस्थाकडून सरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.

सरांच्या मार्गदर्शनाखाली आजवर

  • १ अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेती खेळाडू
  • १०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडू
  • ३ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त विजेते प्रशिक्षक
  • एकूण १४ शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू
  • जवळपास ३१ देशांमध्ये मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण दिले आहे
  • २९७ विदेशी खेळाडूंना मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण दिले आहे
  • अंध, मूक बधीर तसेच अनाथ मुलांनाही मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण दिले आहे
  • १९८४ पासून श्री समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेचे मानद् सचिव
  • १९९० पासून मुंबई विद्यापीठास क्रीडा तज्ञ म्हणून मार्गदर्शन
  • १९९० पासून श्रीमती नाथाबाई दामोदर ठोकरसी महिला विद्यापीठास क्रीडा तज्ञ म्हणून मार्गदर्शन
  • १९९८ – २००२ विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कार्यरत
  • २०१६ पासून विश्व मल्लखांब महासंघाचे संस्थापक संचालक व सचिव म्हणून कार्यरत
  • जर्मनी, ऑस्ट्रिया, हॉंगकॉंग, न्यू मेक्सिको, अमेरिका व सिंगापूर येथे नियमित मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण वर्ग
  • अनेक क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयांवरील शासकीय व निम शासकीय संस्थेवर नियुक्ती
  • १९७३ पासून आजतागायत मल्लखांबावर वृतपत्रे, मासिके. नियतकालिके आदिंमधून विपुल लिखाण.
  • श्री समर्थ व्यायाम मंदिर तर्फे जवळपास २२ स्पर्धांचे आयोजन सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
  • १९९५-९६ साली कुमार – मुली गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो स्पर्धेचे आयोजन
  • २०११ साली ४४ व्या पुरुष – महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन