वैभव स्पोर्टस् क्लब या संस्थेचे महिला पुरुष संघ मुंबई जिल्हा खो खो स्पर्धेत खेळत होते. त्या संघातील महिला खेळाडूंनी १९७७ ते १९८२ सालापर्यंत सतत ७ वेळा महिला संघाचे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा जिंकून संस्थेस मान सन्मान मिळवून दिला. त्या संघामध्ये वीणा परब, मालती पाटील, शुभांगी हळदणकर, वंदना शेट्ये, सुजाता शिर्के या मात्तबर खेळाडूंचा समावेश होता. यातील वीणा परब या खेळाडूस १९८२-८३ साली महाराष्ट्र शासनाने शिव छत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला. तर १९८३ -८४ साली भारत सरकारने तिला सर्वोच्च असा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले.
त्यांनतर मधल्या काळात वैभव क्लब कार्यरत नसल्याने २०१० साली पुन्हा संस्थेचे पुर्नजीवन संस्थेचे प्रशिक्षक व प्रमुख कार्यवाह यांनी करून संस्था पूर्ववत करून २०११ मध्ये किशोर संघात कु. कमलेश जैन याचा समावेश झाला. २०१५ -१६ या साली कु. नेहा रामाणे हि मुंबई जिल्ह्याच्या संघातून ठाणे येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत तर २०१६-१७ साली कु. श्रेया ना____ हिची  मुंबई जिल्ह्याच्या किशोरी गटात निवड झाली.
संस्थेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व खेळाडू संस्थेस पूर्वीचे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी नव्या उमेदीने मैदानात झटत आहेत.