वयाच्या चौथ्या वर्ष पासून श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर मध्ये खेळाडू म्हणून दाखल झालेल्या अरुण देशमुख यांनी सुरुवातीला मल्लखांब आणि कुस्तीचे धडे काळे गुरुजी व्यायामशाळेत घेतले. १९८१ साली काळे गुरुजी मधून लहान मुलांचे वर्ग बंद केल्यावर शिवाजी पार्क मध्ये जेष्ठ खेळाडू म्हणून रायाजी पथक त्यांनी सांभाळल. त्याच सुमारास श्री.शेखर पाठारे यांनी संपूर्ण रायाजी पथक खो खो मध्ये सामील केले आणि खो खो ची श्री गणेश त्यांनी केली. संरक्षण आणि आक्रमण असे दोन्ही भाग करणाऱ्या अरुणकडे संघटनात्मक कौशल्य होते. समर्थाचा १४ वर्षाखालील संघ त्यावेळी अग्रेसर होता. मात्र १९८६ पासून सरांशी त्याचे पटले नाही व समर्थाच्या अॅथलेटिक्स नंतर व्हॉलीबॉल पथकाची जबाबदारी त्याने घेतली. याच दरम्यान श्री उदय देशपांडे यांनी त्यांना प्रशिक्षक होण्यास सांगितले. श्री उदय देशपांडे यांना एकूणच गुरुस्थानी मानल्यावर खोखो विभागापासून ते कार्यकारिणीवर काम करण्या पर्यंत सर्व गोष्टीत अरुणने उडी मारली.

अरुण देशमुख यांनी १९८९ सालापासून श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खो खो विभागाची धुरा खांद्यावर घेतली व या संघाने पाहता पाहता सर्वच गटांमध्ये आपला दबदबा उमटवला. यातील पुढे बाबली वैद्य, साकेत जेस्ते या दोघांनी राष्ट्रीय पुरुष स्पर्धेतील अष्टपैलुचे एकलव्य पुरस्कार, तर साकेत जेस्ते व अश्विन सहस्त्रबुद्धे या दोघांनी राष्ट्रीय कुमार स्पर्धेतील अष्टपैलुचे वीर अभिमन्यू पुरस्कार मिळवले. बाबली वैद्य, साकेत जेस्ते, विकास शिरगावकर, मनोज वैद्य आणि तेजस शिरसकर यांनी महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिव छत्रपती पुरस्कर प्राप्त केला तर स्वतः अरुण देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त झाला. अनेक खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई जिल्हयात श्री समर्थ व्यायाम मंदिराचा पुरुष संघ सलग ११ वेळा अजिंक्यपद विजेता ठरलाय तर महिलांचा संघ ४ वेळा अजिंक्यपद ठरलाय. सुमारे ३० हुन अधिक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. बाबली वैद्य, साकेत जेस्ते, विकास शिरगावकर, मनोज वैद्य  तेजस शिरसकर यांच्या बरोबरीनेच सुशांत बांदिवडेकर, क्रांती खांडेकर, तेजस अमीन, अश्विन सहस्त्रबुद्धे, स्मिता नेवाळकर, स्नेहा नेवाळकर, दीपिका सोनावडेकर, प्रशांत साखरे, भूपेश ठाकूर, शेखर पाटील, मकरंद बाणे, रुपेश शेलाटकर, विराज कोथमकर, वरूण पाटील, स्नेहल बागकर, आशिष जुवळे, अंकित मराठे, प्रशांत आंबारे,  प्राची वाडदेकर, शीतल पांचाळ, ऐश्वर्या कुमामेकर, सिद्धविक भगत, साजल पाटील, अनुष्का प्रभू अशी तगडी खेळाडूंची फळी निर्माण केली. अरुणने सलग २१ वर्ष खो खो चे शिबीर फेब्रुवारी महिन्यात आयोजित केले. दादोजी कोंडदेव पुरस्कार नंतर २५ वर्ष विभाग संभाळल्यावर दुसऱ्या फळीतील निलेश परब याच्या कढे त्यांनी विभागाची धुरा सोपवली व परत लंगडी व पाठोपाठ व्हॉलीबॉल पथक सुरु केले.

अरुण देशमुख यांनी १९९० सालापासून श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या कार्यकारिणीवर आहेत. २००० पर्यंत सदस्य म्हणून कामगिरी केल्यावर आजतागायत कोषाध्यक्ष म्हणून काम सांभाळत आहेत.

१९९० पासून मुंबई खो खो संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य असलेल्या अरुण देशमुख ला १९९६ साली सहकार्यवाह पदावर पदोन्नती झाली. २००३ पर्यंत सहकार्यवाह असताना संघटनेत बरीच उलथापालथ झाली. २००३ ते २००६ संघटनेचे खजिनदारपद भूषवलेले होते तर २००६ साली मुंबई खो खो संघटनेचे कार्यवाहपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. २००७ साली राज्य संघट्नेबरोबर वाद झाल्यावर खेळाडूंसाठी स्वतःहून राजीनामा दिला. अर्थात संपूर्ण मुंबई खो खो संघटनेच्या कार्यकारिणीचा पाठिंबा त्यांच्या मागे असल्याने ११ महिन्यानंतर अस्थायी समितीच्या पश्चात  झालेल्या २००८-२०१२ च्या निवडणुकीत  मुंबई खो खो संघटनेचे कार्यवाहपदी त्यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. याच पदावर २०१२ ते २०१६ साली तसेच  २०१६ ते २०२० सालासाठी  त्यांची पुन्हा कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली. २०१५-२०१६ साली कुमार मुली गटासाठी प्रायोजकत्व देण्याचा निर्णय त्यांनी घेतला व त्यानंतर २०१६-२०१७ व आताच्या २०१७-२०१८ च्या राज्य स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला गटासाठी त्यांनी प्रायोजकत्व बहाल केलेले आहे. संघटनेत अनेक प्रयोग त्यांनी केले. संपूर्ण अहवाल रंगीत करण्या पर्यंतच्या त्यांच्या प्रवासात संघटनेचे संकेत स्थळ आज मानाने येत आहे. मुंबई खो खो संघटनेमध्ये अनेक व्यक्ती अरुणने आणल्या. नंदकुमार वाडदेकर, बाळ तोरसकर, भालचंद्र चांदोरकर, रवी पाष्टे, निलेश परब या सर्वांना संघटनेवर काम करण्यास आवाहन केले. श्री समर्थाचे अध्यक्ष असणारे श्री.उदयदादा लाड यांना संघटनेवर अध्यक्ष म्हणून आणण्यास त्यांनी विनंती केलीली होती. आजही अनेक होतकरू आणि संघटनेस उपयुक्त व्यक्ती जोडण्याचा त्याचा प्रयत्न अव्याहतपणे चालू असतो.

अरुण देशमुख यांनी २००७ साली महाराष्ट्र खो खो संघटनेच्या शासकीय परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली. २०१२ ते आजतागायत शासकीय परिषदेवर सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावलेली आहे.

अरुण देशमुख यांनी पंच म्हणून राज्य राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत अनेक स्पर्धांना पंच म्हणून चोख कामगिरी बजावली आहे. राष्ट्रीय पंच म्हणून अनेक राष्ट्रीय स्पर्धांना त्यांची उपस्थिती असायची. मुंबईमध्ये १९९६ पासून आजतागायत जिल्हा पंच वर्गामध्ये त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केलेले आहे.

अरुणने मुंबई संघाच्या किशोर संघास ३ वेळा तर कुमार संघास २ वेळा तर महिला संघास ३ वेळा प्रशिक्षक म्हणून राज्य स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. राज्याचा कुमार संघाच्या विजयी संघास इंदौर येथे २००६ साली त्याने मार्गदर्शन केले.. मुंबईच्या अनेक वेळा निवड समितीवर काम केलेले होते. मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर २ वेळा काम केले. मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले तर राज्याचे ३ वेळा निवड समिती सदस्य म्हणून काम केले आहे.

१९८९ सालापासून श्री. अरुण देशमुख यांनी कीर्ती महाविद्यालयाचा संघास मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कीर्तीच्या संघाने विद्यापीठ तसेच १९ वर्षाखालील ज्युनियर गटात चांगलीच चमक दाखवली आहे. मंदार म्हात्रे, पराग आंबेकर, सुधीर म्हस्के, बबली वैद्य, साकेत जेस्ते, विकास शिरगावकर, मनोज वैद्य, प्रकाश रहाटे आदी पुरुष तर क्रांती खांडेकर, शीतल पांचाळ, ललिता साळुंखे, प्रीती धुरी.,आदी अनेक महिला खेळाडू यांनी महाविद्यालय तर्फे चमक दाखवली. कीर्तीचा संघाने सुमारे ३ वेळा अजिंक्यपद तर सुमारे ७ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. तर महिलांनीही ३ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे.

अरुण देशमुख यांनी सुमारे २२ पुस्तके लिहिलेली आहेत,. यातील खेळावर लिहिलेली पुस्तके – १. खो खो  २. योगासने  ३. चाला आणि निरोगी राहा  ४,. ज्युदो  ५. पोहणे  ६. प्राणायाम ७. १५५ जागतिक कीर्तीचे खेळाडू ८. साधे  आणि सोपे मैदानी खेळ  ९ शालेय योगासने आणि इंग्रजीत १०. yoga११. advantage of walking.  तर कायद्या विषयक लिहिलेली पुस्तके – १. पोलीस कायदा आणि अटक, २. ग्राहक संरक्षण कायदा ३. घटस्फोट आणि पोटगी ४. मानवी हक्क आयोग  ५. धनादेश ना वटल्यास ६. क्रेडिट कार्डचा भुलभुलैय्या ७.एस आर ए  ८. माहितीचा अधिकार  ९. प्रश्न तुमचे उत्तर कायद्याचे. त्यांनी लिहिलेले कविता संग्रह ना संपणारे शब्द  तर  कादंबरी आहे कुठे तरी पाणी मुरतय.

अरुण देशमुख हे व्यवसायाने वकील व आताचे नोटरी, भारत सरकार म्हणून आहेत.  त्यांची मुलगी अथश्री हि आधी खो खो खेळायची आताची आघाडीची राष्ट्रीय ज्युदोपटू आहे. पत्नी अर्चना गृहिणी आहे