Player Profile

श्री. संजय पेडणेकर

संस्थेचे नाव :अमरहिंद मंडळ, दादर
कार्यकाळ :​२०१८-१९
पुरस्कार :ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार
इतर :अमरहिंद मंडळ - कार्यकर्ता

श्री. संजय पेडणेकर

१९७६ सालापासून ​खेळाडू म्हणून खो खो क्षेत्रात प्रवेश. खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी करता करता श्री. संजय विठ्ठल पेडणेकर यांनी अमरहिंद मंडळाच्या प्रशिक्षक पदाची धुरा वाहण्यास सुरवात केली. सन १९८३ ते १९९५ पर्यंत अमर हिंद मंडळाच्या खो खो संघाचा प्रशिक्षक म्हणून त्यांनी दैदीप्यपूर्ण कामगिरी केली. ​अमर हिंद मंडळाचा संघ हा भारतातील एक अग्रगण्य संघ म्हणून ओळखला जायचा.
 
श्री. पेडणेकर हे १९८६ साली राज्यस्तरीय पंच उत्तीर्ण ​झाले. पंच म्हणून त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर काम पहिले. नोव्हेंबर १९८७ साली कुळगाव, बदलापूर येथे झालेल्या मुली गट राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबईच्या संघाची जबाबदारी पार पडून संघास तृतीय स्थान मिळवून दिले. अनेक वेळा जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेस निवड समिती सदस्य म्हणून काम पहिले. मुंबई खो खो संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम पहिले.
loading